Marathi Bhasha Pandharavada Celebrartion

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा (१४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१)

सेन्ट तेरेसा शिक्षणशास्र महाविद्यालयाने १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला. दैनंदिन जीवनात मराठी भाषेच्या अधिकाधिक वापरास प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयाद्वारे ग्रंथपाल डॉ शकुंतला निघोट आणि अधिव्याख्यात्या डॉ सेरेना डिकून्हा यांच्या मार्गदर्शनाखाली खालीलप्रमाणे विविध उपक्रमांचे आभासी माध्यमाद्वारे आयोजन करण्यात आले.

दिवस १) १८ जानेवारी २०२१
महाविद्यालयाच्या ग्रंथपालांनी "उत्खनन विनामूल्य ऑनलाईन मराठी माहिती संसाधनांचे" (Information Retrival Of Free Online Marathi Books and Information Resources) या कार्यशाळेतून विद्यार्थिनींसमोर नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, ई-साहित्य, नेटभेट: मराठी पुस्तके, ई-मराठी पुस्तके, पीडीएफ ड्राइव्ह, मराठी विश्वकोश इत्यादी संकेतस्थळाद्वारे मराठी साहित्य व पुस्तकांचे भांडार खुले केले. मराठी टंकलेखनासाठी Google Input Tools व Google Docs वर Voice Typing इत्यादी सुविधा प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आल्या.

दिवस २) १९ जानेवारी २०२१
या दिवसाची सुरुवात मराठी भाषेच्या सन्मानार्थ "मराठी अभिमान गीताने" ने झाली. द्वितीय वर्षाच्या ४७ विद्यार्धीनींनी मराठी शुद्धलेखन आणि हस्ताक्षर स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेतला.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
प्रथम पारितोषिक : नेहा घरत
द्वितीय पारितोषिक : प्रितिका म्हात्रे , रेनिका पाटील
तृतीय पारितोषिक : .स्वीनल डाबरे , नेहा यादव

दिवस 3 (२१जानेवारी २०२१)
या दिवशी विद्यार्थिनींनी सकाळची प्रार्थना-सभा मराठी भाषेमध्ये आयोजीत केली, यात मराठीतील प्रार्थना, ईशस्तवन, सुमधुर मराठी गीते आणि मराठी भाषिक व्यक्तिश्रेष्ठांच्या कार्यावरील माहितीपूर्ण व्हिडिओचा समावेश होता.

दिवस ४ (२३ जानेवारी २०२१)
तज्ज्ञांचे व्याख्यान : विषय: भाषा कशी अनुभवावी?
तज्ज्ञ मार्गदर्शक : डॉ.राजश्री पाटील, सहाय्यक प्राध्यापक, एस एन डी टी महिला विद्यापीठ, मराठी विभाग, मुंबई.
मॅडमने आम्हाला दिलखुलास शैलीत मराठी साहित्यिक आणि साहित्यसंपदेची ओळख करून देत, मराठी भाषेचे माधुर्य, सामर्थ्य, वेशीपरत्वे बदलणारे वैविध्य आणि सौन्दर्य आमच्यासमोर अनेक उदाहरणांतून उलगडले. मनमोकळ्या गप्पांतून आज दुर्लक्षित झालेल्या मराठीसह इतर प्रांतीय भाषांच्या दुरावस्थेबद्दल खेद व्यक्त करीत अतिरेकी पाश्चात्यीकरणाच्या प्रवाहात आपली मातृभाषा नामशेष होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी मातृभाषेला अनौपचारिक संवादाची भाषा बनवून तिचे संवर्धन केले पाहिजे या जबाबदारीचे भान त्यांनी तरुण विद्यार्थीनींना दिले. प्रश्नोत्तरांच्या तासानंतर कु नेहा घरात हिने मॅडमचे त्यांच्या ओघवत्या आणि सुश्राव्य व्याख्यानासाठी आभार मानले.

दिवस ५ (२५ जानेवारी २०२१)
"बोलतो मराठी" या अभव्यक्ती कार्यक्रमांतर्गत ४६ विद्यार्थिनींनी खालील विषयांवर मराठीतून उत्कृष्ट मनोरंजनात्मक सादरीकरण केले.
- कथाकथन
- काव्यवाचन
- मराठी पुस्तक / नाटक / चित्रपट परिक्षण.
- मराठी वेषभूषा, खाद्यजीवन, संस्कृती
- गीत-गायन

दिवस ६ (२६ जानेवारी २०२१)
प्रजासत्ताक दिनी विद्यार्थिनींनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख्याने मराठीतून आयोजन केले, देशभक्तीपर भाषणे दिली, सुंदर स्तोत्रे आणि सुमधुर गीते गायली.

दिवस ७ (२८ जानेवारी २०२१०)
मराठी माहिती संसाधनांवर आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषेमध्ये ४८ विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेऊन प्रमाणपत्र संपन्न केले. जोनीता दिब्रिटो, अनाबेल डीक्रूझ, शीतल गावंड, नेहा घरत या चार विद्यार्थिनींनी प्रत्येकी ८७% गुण मिळवत प्रश्नमंजुषेमध्ये प्रथम क्रमांक संपादन केला. अखेरीस राष्ट्रगीताने मराठी पंधरवड्याची सांगता झाली अर्थात तत्पूर्वी प्रत्येकीने भाषा माऊली मराठीचा वापर, प्रचार आणि प्रसार करण्याची खूणगाठ मनाशी पक्की बांधली होती!